नमस्कार


आपणांस येथे सांगण्यास आनंद होत आहे की आम्ही हे संकेत स्थळ ऑनलाइन रेडि रेकनर.कॉम खास मराठी लोकांसाठी बनविली आहे आणि ती ही जागतिक मराठी दिवस, दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ या दिवशी. मराठी दिनाच्या दिवशी मराठीचा आणि मराठी जनांचा मान वाढविणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

प्रत्येकाला झोपेत वा जागेपणी पडणारं सुखद स्वप्न ! हे स्वप्न प्रत्येकाला हवेहवेसे वाटणारं स्वतःचे घर ! आपले हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी गरज लागते ती एका अनुभवी मार्गदर्शकाची ! त्यानुसार हे संकेत स्थळ म्हणजे आपला वाटाड्या ठरणार आहे. आपल्या सोबत आपल्या वास्तवातल्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव तत्पर असणारा.

आम्ही या संकेत स्थळाद्वारे केवळ आपणांस त्रास - मुक्त, सोयीस्कर, सुलभ आणि पूर्णपणे आवश्यक आणि संबंधित माहिती देत आहोत. आपणांस अनुकूल सेवा, शंकांबाबत सहाय्य तसेच आपणांस तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांचे निरसन करण्यासाठी, स्थायी संबंधाच्या सुनिश्चिचिततेसाठी करावा लागणारा पाठपुरावा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारची फसवेगिरी आणि बेकायदेशीर वापरापासून आपले रक्षण करण्यासाठी आम्ही हे संकेत स्थळ सुरु केले आहे.


रेडी रेकनर म्हणजे नक्की काय?


असा आपणांस अनेकदा प्रश्न पडत असतो. तर मूल्य दर तक्ते म्हणजे इंग्रजी भाषेत रेडी रेकनर. हे स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी करणाऱ्यांसाठी वापरात आणला जातो. मूल्य दर तक्ता मध्ये बांधकाम वर्गीकरणासाठी आता जिल्हा, तालुका आणि गाव यांनुसार स्वतंत्र दर निश्चित करण्यात येतात. मूल्य दर तक्त्यानुसार मालमत्तेचा बाजारभाव निश्चित होतो.

नोंदणी महानिरीक्षक तथा मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांच्या मान्यतेनंतर वार्षिक मूल्य दर तक्ते अंतिम केले जातात. २०१६ पासून वार्षिक मूल्य दर तक्ते आर्थिक वर्षानुसार म्हणजेच १ एप्रिल पासून अंमलात येतात.


ह्या संकेत स्थळाचा उपयोग सर्वसाधारण माणसांपासून ते वकील, बांधकाम व्यावसायिक ( बिल्डर / Builder), वित्तीय संस्था (कर्ज देणाऱ्या बँका), जमीन किंवा घर खरेदी - विक्री करणारे मध्यस्थी ( एजंट / Agent ) व संस्था ( Societies ) इत्यादींना या संकेत स्थळाचा उपयोग होणार आहे. • नोंदणी कार्यालय महानिरीक्षक
 • नोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये
 • जिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई
 • सह जिल्हा नबंधक कार्यालये ३४
 • संयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे
 • उपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई
 • सहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय
 • प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई
 • सरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे
 • उप निबंधक कार्यालये ५०४
 • विवाह कार्यालये
Online Ready Reckoner